service photo

स्वच्छ भारत अभियान (ग्रामिण ) योजना 

१) ज्या कुटुंबांनकडे वैयक्तिक शौचालय नाही व यापूर्वी शासनाकडून त्याकरीता कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नाही. अश्या कुटुंब प्रमुखांना वैयक्तिक शौचालय बांधकाम केले असल्यास व वापर सुरु असल्यास प्रोत्साहनपर बक्षिस रु. १२०००/ (अटी कुटुंब प्रमुख हा वि.पी.एल. असल्यास, अनु, जाती, अनु. जमाती, परितक्त्या, विधवा, घटस्पोटीत, अपंग, महिला कुटुंब प्रमुख असणे आवश्यक)

२) गावांमध्ये सार्वजनिक शौचालय बांधकाम करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान (ग्रामिण) अंतर्गत रु. २.१००००/- ग्रामपंचायतीस अनुदान जिल्हा परिषद कडुन निधी प्राप्त झाल्यास वाटप करणे.

३) घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बाबतच्या कामांसाठी ग्रामपंचायतीस गाव्याच्या लोकसंख्ये नुसार कामाच्या किंमतीच्या ७० टक्के अनुदान जिल्हा परिषद कडुन निधी प्राप्त झाल्यास वाटप करणे.